OkCredit म्हणजे आजच्या युगातील व्यवसायाचे डिजिटल उधार वही-खाते, म्हणजेच हिशोबाची वही. OkCredit म्हणजे आपल्या व्यवसायाचे सोपे, पेपरलेस आणि सुरक्षित सोल्युशन, म्हणजेच डिजिटल इंडिया मोहिमेचा एक महत्वपूर्ण भाग. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, OkCredit म्हणजे व्यवसायाचा हिशोब किंवा जमाखर्च ठेवण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या हिशोबाच्या वहीला किंवा खतावणीला OkCredit नावाच्या मोबाईल ॲपचा एक सरळ आणि सोपा पर्याय. जेव्हा आपल्या देशात डिजिटल इंडिया मोहीम राबवली गेली होती, तेव्हा 2016 साली हे ॲप तयार केले गेले. भारतात सर्व लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे ॲप तयार केले गेलं. आता हे व्यापारासाठी अतिशय उपयुक्त असे ॲप व्यापारीवर्गात खूप लोकप्रिय झाले आहे. आपल्या देशातील लघु व्यवसाय म्हणजेच किराणा स्टोअर, जनरल स्टोअर, कपड्यांची, भांड्यांची दुकाने, इलेक्ट्रॉनिक्स शॉप्स किंवा ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट्स आणि रिपेअर अशा प्रत्येक व्यवसायासाठी ऑनलाईन अकाऊंट मेंटेनन्सची सिस्टीमची आवश्यकता असते. हीच गरज OkCredit ॲप पूर्ण करते.
अकाऊंटचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला जाईल
OkCredit हे आपल्या व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या जमाखर्च ठेवण्याच्या प्रश्नाला चुटकीसरशी आणि सहजपणे सोडवणारे एक ऑनलाईन पेपरलेस सोल्युशन आहे. असे वापरायला अगदी सोपे असणारे म्हणजेच “यूझर फ्रेंडली” ॲप ही अगदी प्रत्येक व्यवसायाची गरज आहे. हीच गरज OkCredit ॲप पूर्ण करते. आपले दुकान अगदी एखाद्या छोट्याशा खेड्यात असेल किंवा मोठ्या शहरात, आपण कुठेही हे ॲप अगदी सहज चालवू शकता. आपल्या व्यवसायाला प्रभावीपणे डिजीटाईझ करण्याची क्षमता OkCredit मध्ये आहे. सध्याची कोरोना महामारीची परिस्थिती बघता, सर्वच जण कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन किंवा पेमेंट करू इच्छितात. OkCredit यामध्ये अगदी एक्स्पर्ट आहे. या संपूर्णपणे सुरक्षित किंवा ज्याला तंत्रज्ञानाच्या भाषेत हाईयेस्ट सिक्युरीटल फायरवॉल्स म्हणतात, त्याद्वारे हे ॲप पूर्णपणे सज्ज आहे. ज्यामुळे आपण आणि आपल्या ग्राहकांच्या मधले पैशाचे किंवा देवाणघेवाणीचे व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि गुप्त राहतात. यासोबतच आपला व्यवसायाचा आर्थिक व्यवहार पूर्णपणे सुव्यवस्थित केला जातो. OkCredit हे आपले स्वतःचे डिजिटल इंडियाचे डिजिटल वहीखाते आहे आणि आमच्या यूझर्सचा आमच्यावरच विश्वास हा आमचा अभिमानच आहे. हे मेड इन इंडिया कॅश बुक किंवा लेजर अकाऊंट बुक आपल्या सर्व व्यवहारांना मॅनेज करेल. यासाठी आपल्याला आपल्या ग्राहकांना या ॲपवर जोडावे लागेल आणि त्यांच्यासोबत केलेल्या सर्व उधार-रोख व्यवहारांचा यावर अकाऊंट ठेवावा लागेल. म्हणजे कोणत्या ग्राहकांची किती उधारी अजून यायची आहे, हे आपल्याला होमपेजवरच कळेल आणि आपल्याला त्यांना वसुलीसाठी रिमाईंडर्स पाठवता येतील. जेणेकरून आपली उधारी लवकरात लवकर वसूल होईल.
हिशोबाच्या मोठमोठ्या रजिस्टरला निरोप
आता विसरा ते दिवस, जेव्हा आपण गलेलठ्ठ हिशोबाच्या खतावण्यांमध्ये जमाखर्च लिहिण्यात आणि आकडेमोड करण्यात तासंतास खर्ची घालत होतात. अशा हिशोबात कधीकधी चुकाही होतात आणि मग त्याचा तोटा दुकानदारालाच सहन करावा लागतो. आता या सगळ्या डोकेदुखीपासून आपली सुटका करण्यासाठी आले आहे OkCredit ॲप! हे मोबाईलवर चालणारे ॲप पूर्णपणे फ्री आहे. हे केवळ अँड्रॉईडच नव्हे तर आयओएस सॉफ्टवेअरवरसुद्धा सहजपणे वापरता येते.
हे ॲप आपल्याला वजनदार अकाऊंट बुक्स सांभाळण्याच्या आणि ती फाटण्याच्या, हरवण्याच्या किंवा गहाळ होण्याच्या चिंतेपासून मुक्त करते. आपण आपल्या जुन्यात जुन्या ग्राहकाला या ॲपद्वारे वसुलीसाठी रिमाईंडर पाठवू शकता आणि त्यामुळे आपल्याला त्याच्याशी दरवेळी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून थकबाकी देण्याबद्दल सांगण्यातला अवघडलेपणा अनुभवावा लागत नाही. या ॲपमुळे आपले अकाऊंट मॅनेजमेंट स्मार्ट बनते.
अनेक भाषांमध्ये उपलब्ध
या ॲपला भारताच्या कानाकोपऱ्यातील यूझर्सना वापरता यावे म्हणून ते अनेक भाषांमध्येही बनवण्यात आले आहे. हे ॲप आपण इंग्रजी, मराठी, हिंदी, हिंग्लिश, गुजराती, बंगाली, पंजाबी, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम अशा एकूण अकरा भाषांपैकी आपल्या आवडीच्या कोणत्याही भाषेमध्ये वापरू शकता.
OkCredit च का?
बाजारात सध्या आपल्या दुकानाच्या जमाखर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी अनेक ॲप उपलब्ध आहेत. पण त्यातही केवळ OkCredit निवडण्यामागचे कारण हे की, हे ॲप आपल्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने अनेक सुविधा आपल्याला देते, तेही अगदी चुटकीसरशी. आपण आणि आपल्या ग्राहकांमध्ये हे एक विश्वासाचे नाते निर्माण करते. आपल्या यूझर्सना उत्तम अनुभव मिळावा म्हणून हे ॲप आपले सॉफ्टवेअर सतत अपडेट करत राहते. आपला डेटा यावर इतका सुरक्षित राहतो की कोणत्याही थर्ड पार्टी ॲपदेखील तो शोधू, पाहू किंवा कॉपी करू शकत नाहीत.
घरबसल्या उधारी वसूल
या ॲपद्वारे आपण WhatsApp आणि SMS अशा दोन्ही प्रकारे आपल्या ग्राहकांना उधारी परत करण्याविषयी रिमाईंडर पाठवू शकता. आपल्याला भीम, UPI, गूगल पे, फोन पे, डेबिट/ क्रेडिट कार्ड्स याशिवायही इतर अनेक पर्याय आपल्या सोयीनुसार मिळू शकतात.
संपूर्णपणे सुरक्षित डेटा
या ॲपमध्ये आपला डेटा पूर्णपणे सुरक्षित राहतो. जरी आपला मोबाईल खराब झाला किंवा हरवला आपल्याला आपला डेटा सुरक्षितच मिळेल. यासाठी आपल्याला दुसऱ्या फोनवर आपल्या OkCredit ॲपच्या रजिस्टर्ड नंबरवरून लॉगिन करावे लागेल आणि OTP व्हेरिफिकेशन करावे लागेल. यानंतर आपल्याला आपले OkCredit वरचा आपला अकाऊंट परत मिळेल आणि त्याचबरोबर आपला डेटासुद्धा!
OkCredit कोण वापरू शकते?
हे ॲप भारतातील सर्व प्रकारच्या स्मॉल बिझनेसला सपोर्ट करते. सर्व प्रकारच्या लघु उद्योगांना लक्षात ठेवूनच हे ॲप बनवले गेले आहे आणि ते अगदी हातगाडीपासून ते सुपरमार्केटमध्ये दुकान चालवणाऱ्यांपर्यंत कोणीही अगदी सहजपणे वापरताना दिसतात.
आता बघू या खासकरून कोणकोणते व्यापारी हे ॲप वापरू शकतात. मोबाईल रिचार्ज आणि ऍक्सेसरी शॉप, रिपेयर, डीटीएच रिचार्ज, मेडिकल आणि फार्मसी दुकान, किराणा दुकान, प्रोविजन स्टोअर, फळ आणि भाजी विक्रेते, जनरल स्टोअर, चहाचे दुकान, ज्यूस आणि स्नॅक्स सेंटर, क्लॉथ सेंटर, गारमेंट स्टोअर, होलसेलर्स, डिस्ट्रीब्यूटर्स, सिगरेट आणि पान शॉप, मायक्रो फायनान्स किंवा लघुवित्त संस्था, पर्सनल क्रेडिट बुककीपिंग, इ. इ.
या ॲपसंबंधी वारंवार विचारले जाणारे प्रश्न - FAQs
Q. OkCredit काय आहे?
Ans. हा एक खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न आहे, की OkCredit काय आहे आणि त्याचा आपल्या व्यवसायाला कसा लाभ होतो? याविषयी एक्स्पर्ट सांगतात की, हे एक ऑनलाईन डिजिटल लेजर आहे, जे संपूर्ण भारतात लघु व्यवसायांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. 2016 मध्ये बंगलोरमध्ये डेव्हलप केल्या गेलेल्या या ॲपला केवळ तीन वर्षांत लाखो लोकांनी इन्स्टॉल करून आपला व्यवसाय वाढवला आहे. हे यूझर फ्रेंडली ॲप भारतातील अनेक लोकप्रिय भाषांमध्ये उपलब्ध आहे. याच्या यूझर्सच्या संख्येवरुनच या ॲपची लोकप्रियता लक्षात येते. असाही एक प्रश्न विचारला जातो की, हे ॲप सुरक्षित संपूर्णपणे आहे? याविषयीही तज्ञ सांगतात की, निःसंशयपणे हे ॲप पूर्णपणे केवळ सुरक्षितच नव्हे तर विश्वसनीयही आहे. हे अँड्रॉइड आणि आयओएस सॉफ्टवेअरवरही सुरक्षितपणे चालवता येते. आपल्या डेटाच्या संपूर्ण सुरक्षिततेची आणि गुप्ततेची काळजी इथे घेतली जाते. जरी आपला फोन हरवला किंवा खराब झाला, तरीही आपल्याला आपला डेटा परत मिळतो.
Q. OkCredit ॲप कसे वापरावे?
Ans. गूगल प्ले स्टोअरवर जाऊन OkCredit ॲप शोधा आणि डाऊनलोड करा. नंतर त्या ॲपवर जाऊन विचारलेली सर्व माहिती भरा आणि रजिस्ट्रेशन पूर्ण करा. आपण आपल्याला हवी असलेली भाषासुद्धा आपण निवडू किंवा बदलू शकता. आता आपल्या फोनवर वापरण्यासाठी OkCredit ॲप तयार आहे. यानंतर आपल्या ग्राहकांना उधारीचे रिमाईंडर पाठवणे सुरु करा. लवकरच आपल्याला ग्राहकांकडून वसुली म्हणजेच आपले पेमेंट येणे सुरु होईल.
Q. जर माझा फोन हरवला किंवा खराब झाला तर?
Ans. अनेक दुकानदार किंवा व्यावसायिक हा प्रश्न नेहमीच विचारतात. परंतु जरी आपला फोन हरवला किंवा खराब झाला तरी आपल्याला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. कारण, हे ॲप असे बनवले गेले आहे की, जरी आपला फोन हरवला किंवा खराब झाला तरी आपण दुसऱ्या फोनमध्ये आपला सर्व डेटा सुरक्षित आणि पूर्णपणे परत जसाच्या तसा मिळवू शकता. यासाठी नवीन किंवा दुसऱ्या मोबाईलवर आपला OkCredit वर रजिस्टर्ड असलेला नंबर वापरून लॉगिन करा. तो आपलाच नंबर आहे ना याची खात्री करण्यासाठी आपल्याला एक OTP मिळेल. त्याच्या सहाय्याने लॉगिन पूर्ण करा आणि आपला संपूर्ण डेटा आपल्याला परत मिळेल.
Q. OkCredit कोणत्या देशात बनवले गेले आहे?
Ans. OkCredit हे एक मेड इन इंडिया म्हणजेच भारतात बनवले गेलेले ॲप आहे. हे भारतातील अगदी खेड्यापाड्यांमध्ये किंवा छोट्या शहरातील, गावातील छोटी दुकाने चालवणारे दुकानदार यांच्या गरज लक्षात घेऊन बनवण्यात आले आहे. या ॲपचा उपयोग करून अनेक दुकानदार आणि व्यावसायिकांनी आपला व्यवसाय अनेक पटींनी वाढवला आहे.
Q. OkCredit कसे वापरावे?
Ans. OkCredit डाऊनलोड केल्यानांतर आपला अकाऊंट यावर बनवून आपण हे अगदी सहजपणे वापरू शकता. ॲपच्या होमपेजवर आपल्याला “ग्राहक जोडा” नावाचे एक बटन दिसेल. त्यावर क्लिक करा आणि आपल्या ग्राहकाचे नाव आणि मोबाईल नंबर जोडा. अशा प्रकारे आपल्या सर्व ग्राहकांना किंवा ज्यांनी आपल्याकडून उधारी घेतली आहे, त्या सर्वांना या ॲपवर जोडा. यानंतर “उधार” बटन दाबून आपल्या ग्राहकाची उधारी जोडा आणि त्यांनी उधारी परत केल्यावर “पेमेंट” बटन दाबून त्यांनी जेवढी उधारी परत केली असेल ती रक्कम लिहा. याप्रमाणे आपला सर्व हिशोब एकदम चोख राहील आणि कोणाकडून किती उधारी वसूल होणे बाकी आहे, हेही आपल्याला या ॲपच्या सहाय्याने कळेल.